भारतातील प्रत्येक पुरुषांना पडणारा हा प्रश्न आहे प्रत्येक घरातील हा प्रश्न आहे.आजकाल प्रत्येक पुरुष हा दैनंदिन कामात व्यस्त आहे आणि त्याला कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे तो त्याच्या कामात मग्न असतो.आणि शेवटी तो कामावरून थकून भागून घरी आल्यावर आई त्याच्या बायकोची गाऱ्हाणे सांगते आणि बायको आईचे गाऱ्हाणे सांगते.शेवटी त्याला हेच कळत नाही की बाजू कोणाची घ्यावी आईची की बायकोची आणि जेव्हा तो कोणा एकाची बाजू घेतो तेव्हा घरात भांडणं होतात आणि तो विचारात पडतो की नेमक कोणाची बाजू बरोबर आहे किंवा कोणाची बाजू घेऊ.आणि याच प्रश्नाचं समाधान शोधणार आहोत आज आपण या लेखाच्या माध्यमातून.
आई आणि बायको मध्ये कोणाची बाजू घ्यावी
एक पुरुष म्हणून आपण ह्या जगात आलो आहोत.आणि आपल्या जीवनात स्त्रियांचं खूप मोठं योगदान आहे आणि सगळ्यात जास्त योगदान आपल्या आईच आणि लग्न झाल्यानंतर बायकोचं असत.पण घरात आईच आणि बायकोचं भांडणं झाल आणि आपण कामावरून घरी आल्यावर दोघींनी एकमेकींची गाऱ्हाणे सांगितले तर आपल्याला कळतच नाही की आता आपण कोणाची बाजू घेऊ. आईची बाजू घेतली तर बायको ला राग येईल आणि बायकोची बाजू घेतली तर आईला राग येईल मग अश्या वेळेस पुरुषांना खूप मानसिक त्रास सोसावा लागतो.कधी कधी असे भांडणं खूप विकोपाला जातात.आणि त्याची झळ घरातील पुरुषांना जास्त बसते अश्या वेळेस ते मानसिक तणावाखाली येतात आणि त्यांना कळत नाही की नेमके काय करावे.यात त्यांना घरात सामंजस्य निर्माण करून आई आणि बायको मधील दरी कमी करून त्यांच्या मध्ये प्रेम निर्माण करून घरात शांतता कशी निर्माण होईल या गोष्टी मध्ये गुंतले जातात
आणि मग ह्या सगळ्या तणावामुळे त्याच्या कामावर परिणाम होतो आणि त्यांची आर्थिक, मानसिक रूपाने त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो.आणि त्यामुळे ते एक तर जास्त घराबाहेर जास्त राहतात किंवा कोणी कोणी तर नशेच्या आहारी सुद्धा जातात.अशी खूप उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत.अश्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडतो.
आपल्या घरात शांतता कशी टिकेल ह्या करता काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ
शांत राहणे
आपल्या घरात रोजचे भांडणं होत असल्यास सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शांत राहायचं.
कोण बरोबर आहे कोण चूक आहे या मध्ये आपण पडूच नये आणि शांत राहण्यावर भर द्यावा.आधी दोघींची तक्रार ऐकून घ्यावी आणि दोघींना आधी शांत करावे आणि तुम्ही पण शांत राहावे कारण तुम्ही कामाच्या व्यापातून घरी आल्यावर तुम्हाला
घरी भांडणं होत असल्याचे दिसताच तुम्ही पण आक्रमक होतात आणि छोट्या भांडणाच स्वरूप मोठ्या भांडणात होत असते त्यामुळे तुम्ही त्यांना शांत करा आणि तुम्ही पण शांत रहा.
आईची अपेक्षा
देवच आपल्याला आईच्या रुपात येतो आणि ती आपल्याला नऊ महिने पोटात ठेऊन जन्म देऊन आपल्याला लहानच मोठं करते त्यात तिला कितीही दुःख आल किंवा अपयश आल तरी ते ती आपल्या पर्यंत येऊ देत नाही.कधीकाळी ती पण एक सून असते बायको असते.म्हणून तिच्या पण काही अपेक्षा असतात की आपली सून आल्यावर आपण आता निवांत होऊ किंवा अजून पण तिच्या मनात जे काही असेल ते तिलाच ठाऊक असत पण ती आपल्या मुलाचं चांगलं कस होईल ह्याच भूमिकेत असते.आणि आपण आईचे ऋण ह्या जन्मात फेडूच शकत नाही.पण जेव्हा तुमचं लग्न होत आणि तुम्ही जेव्हा बायको ला आई पेक्षा जास्त महत्त्व देतात तेव्हा तिचा अपेक्षाभंग होतो आणि इथून भांडणाला खरी सुरुवात होते
बायकोची अपेक्षा
आपल लग्न झाल्यावर बायको आपल्या घरी येते आणि ती पण आपल्याला आई सारखी माया देते
आपल्याला आधार देते आयुष्यभर आपल्याला साथ देते.ती पण आपले आई वडील सोडून स्वतःच घर सोडून फक्त तुमच्या साठी आलेली असते त्यामुळे तिच्या पण तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात.जेव्हा तुमचं लग्न होत आणि ती तुमच्या घरी येते काही दिवस तुम्ही तिला वेळ देतात पण कालांतराने तुम्ही तुमच्या कामात गुंतून जातात तेव्हा तिला एकटेपणा जास्त जाणवतो आणि काही जण तर mom's boy
पण असतात आणि आई आईच करतात त्यामुळे तिला अस वाटत की मी एवढं घर दार आई वडील सोडून आले आणि हा मला महत्व आणि वेळ देत नाही इथूनच मग भांडणाला सुरुवात होते
बाजू कोणाची घ्यावी
आपल्या जीवनात आईच आणि बायकोचं सारखाच महत्त्व असत.त्यामुळे कोणा एकाची बाजू घेऊ नका.त्या आपल्या जागी बरोबर असतात.त्यामुळे तुम्ही दोघींना सारखंच महत्त्व द्या.बायको समोर आईचा मान ठेवा आणि आई समोर बायकोचा.दोघीही आपल्याला एक Godgift च असतात आणि दोघींचा मान ठेऊन दोघींना सारखंच महत्त्व दिलं पाहिजे.देव हा आईच्या रुपात आलेला असतो आणि बायको ही आईच्या रुपात आलेली असते.आणि दोघींमध्ये सामंजस्य निर्माण करून घरात कशी शांतता निर्माण करता येईल त्या वर भर द्यावा